अल्पवयीन मुलीशी विवाह करून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी नवऱ्यासह ५ जणांवर गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
जत – राज्यात मुली व महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार होत आहेत. मात्र जतमध्ये अल्पवयीन मुलीशी विवाह करून बाल विवाह कायद्याचे उल्लंघन केले आहे. जत येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह करून तिच्यावर लैंगिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी, पिडीत मुलगी बाळंत होऊन तिला मुलगी झाल्यानंतर पाच जणांविरोधात जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ६४, ६४ (२) (एम), लैंगिक अपराधांपासून बालकांचे प्रतिबंध अधिनियम, २०१२ चे कलम ४, ६, ८, १२ आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ चे कलम ९, ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पती, अविनाश संभाजी गडदे, सासरे, संभाजी वसंत गडदे, सासू, शोभा संभाजी गडदे (सर्व रा. विठ्ठल नगर तंगडी मळा, जत), तसेच आई-वडील व आरोपी सासरे संभाजी वसंत गडदे, सासू शोभा संभाजी गडदे आणि पिडीतेचे आई-वडील यांनी पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिचे लग्न आरोपी अविनाश संभाजी गडदे यांच्याशी लावून दिले, असा आरोप आहे. विवाहानंतर, आरोपी पतीने पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही सासरी तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि तिला गर्भवती केले. दिनांक १७ डिसेंबर रोजी रात्री ११:४५ वाजता पिडीतेची बाळंतपण होऊन तिला मुलगी झाली. कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात पिडीत मुलीचा जबाब नोंदवण्यात आला होता. तो जबाब मिळाल्यानंतर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत.