सराफ दुकान लुटणा-या आरोपीस केले जेरबंद, पुणे गुन्हे शाखा युनिट-५ ची कामगिरी

Spread the love

सराफ दुकान लुटणा-या आरोपीस केले जेरबंद, पुणे गुन्हे शाखा युनिट-५ ची कामगिरी

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – पुण्यातील बोराटे वस्ती बी.टी. कवडे रोड घोरपडी, मुंढवा या ठिकाणी फिर्यादी हे दुकानामध्ये हिशोब करीत बसले असताना अनोळखी आरोपींनी दुकानाचे शटर अर्धे खाली ओढुन फिर्यादी यांना पिस्तुलचा धाक दाखवुन त्यांचे तोंडावर कोणतातरी स्प्रे मारुन, फिर्यादी यांना लोखंडी हत्याराने मारहाण करुन दुकानातील ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरुन नेल्याने त्याबाबत फिर्यादी यांनी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्याने मुंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४६६ / २०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०९ (६), ३ (५) भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) सह १३५ या कलमान्वये गुन्हा दाखल करणेत आलेला होता.

वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे दाखल गुन्हयाचा गुन्हे शाखा युनिट – ५ पथकाकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. सदर गुन्हा केलेल्या अनोळखी आरोपींनी त्यांची ओळख पटण्याचे दृष्टीने कोणताही उपयुक्त पुरावा किंवा सुगावा मागे ठेवला नव्हता. गुन्हे शाखा युनिट – ५ पथक यांचेकडुन आरोपीचा शोध सुरु होता. अनोळखी आरोपींनी त्यांची ओळख पटु नये किंवा त्यांचा शोध लागु नये या हेतुने गुन्हा केल्यानंतर त्यांचे अंगावरील जकीन बदलले होते. दि.२१/१२/२०२४ रोजी मिळालेल्या गोपनीय बातमीदाराकडुन तसेच पडताळणी करण्यात आलेल्या तांत्रीक विश्लेषणावरुन सदरचा गुन्हा मनोज सुर्यवंशी राधायरी पुणे याने त्याचे साथिदारांसह मिळुन केला असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने लागलीच पोलीस स्टाफसह सदर इसमाची माहिती काढुन त्याचे प्राप्त पत्यावर समक्ष जावुन त्याचा शोध घेतला असता, सदर आरोपी त्याचे राहते घरी मिळुन आल्याने त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव मनोज ऊर्फ मन्या तुकाराम सुर्यवंशी वय २३ वर्षे, रा. ये बिल्डींग पाहिला मजला, मारुती मंदीर जवळ धायरी फाटा पुणे असे असल्याचे सांगितले. सदर व्यक्तीकडे अधिक तपास केला असता, त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर २ साथिदारांसह केला असल्याचे कबुल केले व तपासामध्ये तसे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीस ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही कामी मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ चे पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सपोनि. विजयकुमार शिंदे, पोलीस अंमलदार प्रमोद गायकवाड, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख, उमाकांत स्वामी, सैदोबा भोजराव, शुभम शेख, तानाजी देशमुख, सचिन मेमाणे, शहाजी काळे, पृथ्वीराज पांडुळे, पल्लवी मोरे, स्वाती गावडे, अमित म्हाळसेकर, अमित कांबळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon