मुंबईत १७ वर्षीय मुलीवर अत्याचार; चौघांविरोधात गुन्हा दाखल, दोन अटकेत, तर दोन फरार
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी पीडित मुलीवर वेगवेगळ्या वेळी अत्याचार केला असून मुलगी गर्भवती आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडित मुलीच्या मावशीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी बलात्कार व बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १७ वर्षांची असून २२ जुलै ते २२ सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी २८ वर्ष व ३० वर्ष वयोगटातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.