नाशिकरोडला ६१ हजारांचा नायलॉन मांजा जप्त, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – राज्यात नायलॉन मांजा ला बंदी असताना देखील त्याची विक्री जोरात सुरू आहे. नाशिककरोड पोलिसांनी एकलहरारोडवरून ६१ हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे ९७ गट्टू जप्त केले. पोलिस शिपाई समाधान वाजे आणि अजय देशमुख हे दोघे गस्तीवर असताना त्यांना देवेंद्र गोविंद शिरसाठ हा इसम नायलॉन मांजा विक्री करतो अशी गोपनीय माहिती मिळाली.
नाशिक बाजार समितीच्या सिन्नर फाटा मार्केटजवळ शिरसाठ हा प्लॅस्टिकच्या एका गोणीत मांजा घेऊन निघाला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने वाजे आणि देशमुख यांनी त्याची चौकशी केली असता त्याच्या गोणीत ६१ हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे ९७ गहू आढळले. मांजा जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.