तारापूर एमआयडीसी मध्ये अग्नितांडव, कंपनीला भीषण आग
योगेश पांडे/वार्ताहर
पालघर – बोईसर तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल या कंपनीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. आगी नंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी झाल्या होत्या. यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. ट्रान्सफार्मरला लागलेल्या आगीनंतर कंपनीत आगीचा भडका उडाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या आगीत कोणतीहीजीवितहानी नाही, मात्र कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे. बोईसर तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल या कंपनीला सोमवारी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. जी ३५ या प्लॉटवरील विराज प्रोफाइल कंपनीला ही आग लागली होती. सर्वात प्रथम ही आग ट्रान्सफार्मरला लागली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं.