बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचारा विरोधात जगाचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने भिवंडी गावात मोर्चा
योगेश पांडे/वार्ताहर
भिवंडी – बांग्लादेशात अल्पसंख्य समुदाय, विशेषतः हिंदूंवर हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच हिंदू भिक्षू चिन्मय कृष्ण दास यांना राजद्रोहाच्या खटल्याखाली अटक करण्यात आली. या घटनेनंतर हिंसा उफाळून आला. बांग्लादेशी ध्वजाच्या कथित अपमानाचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप व्यक्त होत आहे. या अत्याचारांविरोधात पुढील आठवड्यात बांग्लादेश दूतावासाबाहेर मोठा निषेध मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे. भारतातील २०० हून अधिक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागरिक समाजाच्या सदस्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली आहे.
बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात भिवंडी येथील काल्हेर गावात सनातन धर्म सभेने आयोजित केलेल्या आंदोलनात भाजप आणि विश्व हिंदू परिषदेसह अन्य हिंदू संघटना सहभागी झाल्या.
या कार्यक्रमात शामिल झालेल्या बजरंगदल कार्यकर्ताने सांगितले की, या मोर्चाचा उद्देश बांग्लादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांच्या छळाविरोधात जगाचे लक्ष वेधने आहे.