धक्कादायक ! नातवाने कुन्हाड, दगडाने मारून केला आजीचा खून; वडिलांच्या उपचारावरून वाद; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
पोलीस महानगर नेटवर्क
सोलापूर – वडिलांना कोणत्या दवाखान्यात उपचार करायचे, या कारणावरून आजी व नातू यांच्यात झालेल्या वादावरून नातवाने कुन्हाड, दगडाने मारून आजीचा खून केला आहे.
ही घटना कुरनुर (ता. अक्कलकोट) येथे दि. २ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. याबाबत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतराम विठोबा सुरवसे यांनी फिर्याद दिली आहे. यात निर्मला संतराव सुरवसे (वय ७०, रा. कुरनुर, ता. अक्कलकोट) मरण पावल्या आहेत. या प्रकरणी सुमित सदाशिव सुरवसे (वय १९ रा. कुरनुर ता. अक्कलकोट) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत हकिकत अशी की, यातील निर्मला सुरवसे आणि आरोपी हे नात्याने आजी-नातू असून, दि.२ डिसेंबर रोजी रात्री ९ वा.चे सुमारास निर्मला संतराव सुरवसे हिस आरोपी याने वडिलांवर कोणत्या दवाखान्यात उपचार करायचा, यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून आजीच्या डोक्यात दगडाने मारून व कुन्हाडीने गळ्यावर, मानेवर वार करून ठार मारले आहे. आरोपी सुमित सुरवसे यासा पोलिसांनी तत्काळ अटक करून येथील कोर्टासमोर उभे केले असता त्यास तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पीएसआय पांडुरंग पवार हे करीत आहेत. घटनास्थळी डीवायएसपी विलास यामावर, पोलिस निरीक्षक महेश स्वामी, सपोनि. नीलेश बागाव यांनी भेट देऊन पाहणी केली.