पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी, पोलीसांनी ३४ वर्षीय महिलेला घेतलं ताब्यात

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी, पोलीसांनी ३४ वर्षीय महिलेला घेतलं ताब्यात

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात बुधवारी रात्री एक फोन आला. हा फोन आल्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली. कारण फोन करणाऱ्या व्यक्तीने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं. त्या कॉलरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा कट रचल्याची धमकी दिली. बुधवारी रात्री ९ च्या सुमारास नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. मुंबई पोलिसांनी तातडीने फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला. यामध्ये कॉल करणारी व्यक्ती एक महिला असल्याचा दावा करण्यात येतोय. या कॉल प्रकरणी शितल चव्हाण – ३४ नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी मुंबईच्या आंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. प्राथमिक तपासात महिला मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याच कळतय. स्टँडर्ड प्रोसिजरनुसार पोलिसांकडून तपास सुरु आहे. महाराष्ट्रात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मागच्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. सध्या राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. या दरम्यान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारा हा फोन कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात सध्या राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. मंगळवारी एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. नवीन सरकार अस्तित्वात येईपर्यंत एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहतील. यात कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon