नाशिक साल्हेर किल्ल्यावर दुहेरी हत्या; ग्रामीण पोलिसांनी ६ आरोपींना अटक,जमिनीच्या वादातून हत्येचा संशय
रवि निषाद/प्रतिनिधि
नाशिक – नाशिकच्या साल्हेर किल्ल्यावर एकाच दिवशी दोन लोकांच्या हत्या करणाऱ्या ६ आरोपींना नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. रामभाऊ गोटीराम वाघ,६० वर्ष आणि नरेश रंगनाथ पवार, ६३ वर्ष अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकच्या जायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत साल्हेर किल्ल्यावर २२ नोव्हेंबर रोजी दोन अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळुन आले होते. मृतकांच्या अंगावरील कपडे आणि त्यांच्याजवळ असलेल्या वस्तू यांची ओळख पटविण्यात आली. यातील मयत रामभाऊ गोटीराम वाघ (६०) रा. गोपालखड़ी तालुका कळवण आणि नरेश रंगनाथ पवार (६३) रा. कळवण, तालुका कळवण असे असल्याचे निष्पन झाले. यातील अज्ञात इसमाच्या डोक्यावर, चेहन्यावर, मानेवर कशानेतरी घाव घालून जीवे ठार मारून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानी मृतदेह निर्जनस्थळी डोंगरावर टाकून देण्यात आले होते. या बाबत जायखेड़ा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५००/२०२४ भा.न्या. सं.कलम १०३ आणि २३८ प्रमाणे नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडून केलेल्या तपासात अशी माहिती मिळाली की, दोन्ही नाव असलेल्या इसमांचे मिसिंग केस अभोणा पोलिस ठाण्यात नोंद आहेत. सदर घटनेबाबत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधीक्षक मालेगांव अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगांव ग्रामीण नितिन गणापुरे यानी तात्काळ दखल घेऊन सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि जायखेड़ा पोलिसाना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि जायखेड़ा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यानी सदर गुन्हातील सविस्तार माहिती घेतली. यातील दोन्ही मयत हे १३ नोव्हेंबर, २०२४ रोजी मोटरसायकल वर कळवण वरुण सटाणाच्या दिशेने गेले असल्याची माहिती मिळाली. त्यावरून तपासाची चक्रे फिरवुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस आणि जायखेड़ा पोलिसनी त्याच दिशेनी सतत दोन दिवस साल्हेर किल्ला आणि केलझर धरण परिसरात पाळत ठेवून खालील संशयीतांना ताब्यात घेतले. त्या आरोपींनी गुन्हाची कबूली दिली असून विश्वास दामू देशमुख (३६),तानाजी आनंदा पवार (३६),शरद उर्फ़ बारकु दुगाजी गांगुरडे (३०), सोमनाथ मोतीराम वाघ (५०),गोपीनाथ सोमनाथ वाघ (२८) आणि अशोक महादु भोये (३५) अशी नावे आहेत. तपासात सर्व आरोपींनी पोलिसांना माहिती दिली की, सोमनाथ मोतीराम वाघ आणि मयत रामभाऊ गोटीराम वाघ यांच्यात जमीनीचा वाद होता. त्या जमीनीचा वादाटून हे कृत्य त्या लोकांनी केले आहे. सदर गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार व त्यांच्या पथकाचे डैशिंग पोलिस हवालदार गिरीश निकुंभ, शिवाजी ठोंबरे, शरद मोकल, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील आणि इतरानी उत्तम कामगिरी केली.