ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
निवडणुका जिंकल्या की ईव्हीएम चांगले, हरल्या की छेडछाड; याचिका फेटाळत सु्प्रीम कोर्टाने कडक शब्दात सुनावले
योगेश पांडे/वार्ताहर
नवी दिल्ली – विधासनभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. महायुतीने २३० पेक्षा अधिक जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला . महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर विरोधी पक्षातील नेत राज्यातील नेत्यांनी वारंवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विश्वासहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले. ईव्हीएम मशीनमुळे आपण हरलो,असा दावा केला होता. या विरोधात विरोधकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. परंतु ईव्हीएम ला विरोध करणारी याचिका सु्प्रीम कोर्टाने फेटाळली आहे. ईव्हीएम आणि बॅलेट याविषयी कायम चर्चा असतात. महाराष्ट्रातील निवडणुकांनंतर ईव्हीएम आणि बॅलेट पेपरचा मुद्दा आला होता. ईव्हीएमवर शंका घेत महाविकासआघाडील नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. डॉ. के. ए. पॉल यांनी सुप्रीम कोर्टात यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. ईव्हीएमवर निवडणुका न घेता बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. या अगोदर देखील अशी याचिका दाखल करण्यात आली होती. न्या. विक्रम नाथ, न्या. वराळेंच्या खंडपीठाने हे आदेश दिले.
याचिका फेटाळतना सर्वोच्च न्यायलयाने स्पष्ट शब्दात निरीक्षण नोंदावले आहे, जिंकलं की तुम्हाला ईव्हीएम चांगले वाटतात, मात्र निवडणूक हरले की तुम्हाला त्यात छेडछाड दिसते असे म्हणत सु्प्रीम कोर्टाने कडक शब्दात सुनावले आहे. पॉल यांनी केलेली याचिका जुनी होती. एलन मस्क हे एक्सचे (पूर्वीचे ट्वीटर) मालक यांनी पोस्ट करत ईव्हीएम हॅक झाल्याचा दावा केला होता. त्या दरम्यान त्यांच्या पोस्टचा हवाला देत याचिका दाखल करण्यात आली होती. ईव्हीएममध्ये गडबड होण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपर घ्या, जेणेकरून भारतीय नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास दृढ होईल. परंतु ही याचिका फेटाळली आहे.