पुण्यात शेअर बाजाराच्या नावाखाली ७१ लाखांची फसवणूक, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
बावधन, पुणे – शेअर बाजाराच्या नावाखाली एका नागरिकाची ७१ लाख ५० हजार ९० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना बावधन येथे घडली. पराग अशोक वाधोने (वय ४८, रा. बावधान, पुणे) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. २५) याबाबत सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी व्हॉटसॲप ग्रुप ॲडमीन वेरोनिका गुप्ता व्हॉटसॲप नंबर +९१८९६१२४९३६८, ९८३१५६११०६, ८४२०६१४८१ व ८५८५८६३०८० चे धारक, बंधन बँक खाते क्र. २०१०००२९४५९२२१, २०१०००३००७१८१२ चे धारक, सारस्वत सहकारी बँक लिमिटेड खाते क्रमांक – १००००००००४२४९० चे धारक, बँक ऑफ महाराष्ट्रचे खातेधारक ६०४७३४०९३२५ धारक, सोशल मिडीया प्लॉटफॉर्म इंस्टाग्राम, एचडीएफसी इन्स्टिट्यूशनल खातेधारक अशा एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ जुलै २०२४ ते २३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत बावधन, पुणे येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे @parag.wadhone या इंस्टाग्राम अकाउंटवर रिल्स बघत होते. त्यावेळी इंस्टाग्रामवर फिर्यादी याना दिसलेल्या रिल्या वरील लिंकला क्लिक केले अराता फिर्यादी यांचा व्हॉटसॲप हा व्हॉटसअप ग्रुप के१- एचडीएफसी सेक्युरिटीज ग्रुप या व्हॉटसअप ग्रुप मध्ये आपोआप ॲड झाला. या ग्रुपवरील ऍडमिन वेरोनिका हिने फिर्यादी पराग यांना स्टॉकची नावे पाठविली. तसेच बँक खात्यावर एकूण ५० लाख ७७ हजार ६०० रुपये पाठवण्यास सांगितले. ही रक्कम वेगवेगळ्या स्टॉक्स मध्ये गुंतवणुक केल्याचे फिर्यादी यांना प्लॅटफॉर्मवर दिसुन आले. ही रक्कम फिर्यादी पराग हे काढण्यास गेले असता आणखी २० लाख ७२ हजार ४९० रुपये भरण्यास भाग पाडले. तसेच फिर्यादी यांना गुंतवणुक केलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक केली. सायबर पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.