‘पोलिस महानगरच्या’ बातम्यांवर परिमंडळ-६ च्या पोलिसांची करडी नजर

Spread the love

‘पोलिस महानगरच्या’ बातम्यांवर परिमंडळ-६ च्या पोलिसांची करडी नजर

रवी निषाद/प्रतिनिधि

मुंबई – मानखुर्द पोलिसांच्या हद्दीत सुरू असलेल्या तेल माफियांच्या काळ्या धंद्याबाबत दैनिक ‘पोलिस महानगर’ मराठी या वृत्तपत्रात पर्दाफाश करण्यात आला होता. या तेल माफियांच्या व्यवसायावर पोलिसांची देखील नजर असून वृत्तपत्रात तेल माफियांविरोधात बातम्या प्रकाशित झाल्यापासून माफिये भूमिगत झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्दच्या मंडाला परिसरात भंगार बाजार खाडीजवळ दोन डझनाहून अधिक लोकं काळ्या तेलाचा धंदा करत असल्याची खात्री पटल्यानंतर दैनिक “पोलीस महानगरच्या” ने याबाबत सातत्याने आवाज उठवून तेल माफियाना सळो की पळो करून सोडलं आहे. पोलीस महानगर प्रतिनिधीने या तेल माफियांबाबत सत्यशोधक वृत्त संकलित करून पोलीस महानगरात प्रसिद्ध केल्यानंतर परिमंडळ-६ चे धडाकेबाज पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या पथकाने मानखुर्द पोलिसांच्या संगनमताने सुरू असलेल्या तेल माफियांच्या काळ्या धंद्यावर धडक कारवाई सुरू केली. पोलिसी कारवाईमुळे सध्या हा व्यवसाय पुर्णपणे बंद झाला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मानखुर्द मंडाला भंगार बाजारातील खाडीपाशी आजही पोलिस महानगरचे पथक लक्ष ठेऊन आहे. पोलीस उपायुक्त ढवळे व त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी बारकाईने लक्ष ठेऊन आहेत आणि मानखुर्दमध्ये अशीही चर्चा चालू आहे की, तेल माफियांच्या काळ्या धंद्यावर पोलिसांची आता करडी नजर आहे. सध्या या परिसरात “दैनिक पोलीस महानगर” ने केलेल्या तेल माफियांच्या बातमीमुळे दैनिक पोलीस महानगरची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon