घाटकोपरमध्ये १८ वर्षीय तरुणी ठरली लव्ह जिहादची बळी, मारवाडी समाजाकडून रस्त्यावर उतरून निषेध
रवी निषाद/प्रतिनिधि
मुंबई – घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लव्ह जिहादची शिकार झालेल्या १८ वर्षीय तरुणीला वाचवण्यासाठी संपूर्ण मुंबईतील मारवाडी समाज रस्त्यावर उतरला आहे. गुन्हेगार नौशाद महमूद शेख (वय २०) याच्या ताब्यातुन सुटका करुन त्याला मानखुर्द बालसुधार गृहात पाठवण्यात आल्याने मारवाडी समाजातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर चिराग नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दूध डेअरी मध्ये नौशाद महमूद शेख (२०) नावाचा सराईत गुन्हेगार नेहमी दूध संकलनासाठी येत असे, त्याने दूध डेअरीच्या मालकाच्या १८ वर्षीय मुलीला फुस लावून आपल्या संपर्कात आणले. त्याने सापळा रचून त्या मुलीला लग्नाच्या बहाण्याने पीडितेच्या अगदी जवळ आला आणि दोघांनी एकत्र राहण्याची शपथ घेतली वपळून जाण्याची तयारी सुरू केली. हा प्रकार पीडित मुलीच्या नातेबाइकना समजल्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ती आपल्या सांगण्यावर ठाम राहिली, हे प्रकरण घाटकोपर पोलीस ठाण्यात पोहोचले, पण त्या युवतीने कुणाचेही ऐकले नाही, पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, ती नराधम नौशादच्या प्रेमात इतकी पागल झाली की ती आपल्या आई बापावर आरड़ा ओरडा करू लागली. घाटकोपर येथे हजारोंच्या संख्येने जमलेल्या लोकांनी पोलिसांसमोर जोरदार हंगामा केला. बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आणि मारवाडी समाजाच्या लोकांनी एकच गोंधळ घातला आणि त्यानंतर पोलिसांनी मुलीला उपचार आणि संगोपनासाठी महिला बालसुधारगृहात पाठवले आहे. त्यानंतर मारवाडी समाजातील लोकांचा राग शांत झाला आहे, पण लव्ह जिहादच्या पीडितेचे वेड कधी संपणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.