स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना २ डिसेंबर रोजी पुण्याच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Spread the love

स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना २ डिसेंबर रोजी पुण्याच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

योगेश पांडे/वार्ताहर 

पुणे – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामी व अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने २ डिसेंबर रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याबाबात समन्स बजावले आहे. गांधी यांना सोमवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, सध्या ते प्रचारात व्यस्त असल्याने राहुल गांधी न्यायालयात हजर राहू शकले नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर गांधी यांना २ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी दिले आहे.

राहुल गांधी यांनी लंडन येथील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केलं होतं. या प्रकरणी सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयात राहुल गांधी यांच्या वमानकारक व्यक्तव्या प्रकरणी पुण्यातील न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. न्यायालयाने राहुल गांधी यांना सोमवारी विशेष न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविले होते. मात्र, ते उपस्थित राहिले नाही. त्यांना यापूर्वी तीन समन्स देण्यात आहे आहे. त्यांचे हे समन्स दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाऐवजी पातियाळा येथील न्यायालयात पोहोचल्याने ते पुन्हा पुण्यातील न्यायालयात पाठविण्यात आले होते. त्यानंतर गांधी यांना पुन्हा समन्स बजाविण्यात आले होते. मात्र, प्रचारात व्यस्त असल्याने ते पुण्यातील न्यायालयात सोमवारी उपस्थित राहू शकले नव्हते. राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील भाषणात म्हटले होते की, सावरकरांनी एका पुस्तकात लिहिले आहे की त्यांनी आणि त्यांच्या पाच-सहा मित्रांनी एकदा एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती आणि ते (सावरकर) खूश होते. याचिकेनुसार, सावरकरांनी कुठेही तसे लिहिलेले नाही.

न्यायालयाने पोलिसांना आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. विश्रामबाग पोलिस स्टेशनने या प्रकरणी चौकशी केली असता तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याचे सांगितले. न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील विशेष खासदार/आमदार न्यायालयाने ४ ऑक्टोबर रोजी राहुल गांधी यांना समन्स बजावून २३ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, समन्स न मिळाल्याचे सांगण्यात आल्याने गांधी हजर झाले नाहीत.

याचिकाकर्ते सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले की, राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्याची विनंती त्यांनी सोमवारी न्यायालयाला केली होती. गांधी यांच्या वतीने ॲड. मिलिंद पवार यांनी न्यायालायत अर्ज केला. गांधी प्रचारात व्यस्त असल्याने ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. संबंधित समन्स गांधी यांच्या कार्यालयात पोहाेचले आहे, असे ॲड. पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon