मानपाडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना दक्षता पदक
डोंबिवलीतील १९ वर्षीय मुलाचे दीड कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करून त्याला गुजरातच्या एका घरात डांबून ठेवणाऱ्या पाच आरोपींना अटक करून मुलाची सुखरूप सुटका करणारे मानपाडा पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक (सध्या सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे) शेखर बागडे यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक गुरुवारी जाहीर झाले.
पदक जाहीर झाल्याबद्दल पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. डोंबिवलीतील एका व्यापाऱ्याचा मुलगा रुद्र याचे ९ नोव्हेंबर २०२२ रोजी अपहरण झाले होते. त्याला सोडविण्यासाठी दीड कोटींच्या खंडणीची मागणी केली होती.