धक्कादायक ! डोंबिवलीत लाडक्या बहिणींकडून उकळले पैसे, पोस्ट व्हायरल करताच फोन करून जीवे मरण्याची धमकी

Spread the love

धक्कादायक ! डोंबिवलीत लाडक्या बहिणींकडून उकळले पैसे, पोस्ट व्हायरल करताच फोन करून जीवे मरण्याची धमकी

योगेश पांडे/वार्ताहर 

डोंबिवली – डोंबिवलीजवळील सागाव चेरानगर भागात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी काही जणांनी पैसे उकळल्याचा प्रकार उघड झाला असून या घटनेमुळे महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारावर आवाज उठवणारे धीरज तिवारी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली असून त्यांना राजन पांडे या व्यक्तीने मारहाण करण्याची धमकी दिली आहे. याबाबत धीरज तिवारी यांना जीव ठार मारण्याची धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी राजन पांडे याच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. धीरज तिवारी हे सागाव येथे राहणारे असून, त्यांनी सांगितले की, काही लोक गरीब महिलांकडून अर्ज भरण्याच्या बदल्यात पैसे घेत आहेत. या योजनेत कोणतीही फी नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले असतानाही महिलांकडून ३०० रुपये घेतले जात आहेत. तसेच, याबाबत तिवारी यांनी विरोध केला असता एका महिलेने त्यांच्या पत्नीला फोन करून धमकी दिली.तुम्हाला डोंबिवलीत राहायचे आहे की नाही?असा प्रश्न विचारून त्यांनी तिवारी कुटुंबाला धाक दाखवण्याचा प्रयत्न केला.

तिवारी यांनी या प्रकरणी भाजपचे कल्याण ग्रामीण उत्तर भारतीय सेलचे वरिष्ठ नागेंद्र फौजदार यांना भेटून त्यांना घटनेची माहिती दिली. फौजदार यांनी तातडीने लक्ष घालून समोरील महिलांना शांतपणे बोलावण्यास सांगितले, परंतु यावर सदर महिलेने अपशब्द वापरत तिवारी यांना धमकावले. या दरम्यान, त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत धीरज तिवारी आणि त्यांच्या कुटुंबाला धमक्या दिल्या की,तुम्हाला इथे राहू देणार नाही, तुमचे प्रकरण आम्ही वरिष्ठांना सांगू त्यानंतर तिचे सहकारी राजन पांडे यांनीही धीरज तिवारी यांना धमकावले. पैसे उकळण्याच्या प्रकरणावर कोणीही तक्रार केली तर त्यांना मारले जाईल. या सर्व घटनांची साक्ष असल्याचे तिवारी यांनी सांगितले आहे. या घटनेच्या विरोधात धीरज तिवारी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात राजन पांडे यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon