निवडणूक भरारी पथकाकडून कल्याण येथील चक्कीनाका परीसरातून लाखो रूपयांची विदेशी दारू जप्त

Spread the love

निवडणूक भरारी पथकाकडून कल्याण येथील चक्कीनाका परीसरातून लाखो रूपयांची विदेशी दारू जप्त

योगेश पांडे/वार्ताहर 

कल्याण – कल्याण येथील पूर्व भागातील चक्कीनाका भागात विधानसभा निवडणूक भरारी पथकाने शनिवारी संध्याकाळी एक लाख १० हजार रूपयांची विदेशी दारू एका वाहनातून जप्त केली. या दारू खरेदी, विक्रीच्या पावत्या आणि याविषयी सविस्तर माहिती वाहनातील इसम देऊ शकला नाही. त्यामुळे भरारी पथकाने हे वाहन अधिकच्या चौकशीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. निवडणूक विभागाचे भरारी पथक कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात शनिवारी संध्याकाळी संशयास्पद वाहनांची तपासणी करत होते. यावेळी या चौकातून एक मोटार वेगाने जात होती. पथकाने ही मोटार अडवली. या मोटारीत बडवायझर कंपनीच्या ३८ इंचाच्या बाटल्यांचे खोके आढळून आले. वाहनातील इसमाकडे पथकाने या विदेशी दारू खरेदी आणि विक्रीच्या पावत्या मागितल्या. त्याची माहिती वाहन चालकासह त्याचा साथीदार देऊ शकला नाही.

निवडणूक कामात या विदेशी दारूचा गैरउपयोग होण्याची शक्यता असल्याने पथकाने ही माहिती तातडीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक आर. डी. आव्हाड यांना दिली. हवालदार वाय. के. गायकवाड, पंच सुनील कशिवले, रोहिदास डोक यांच्या उपस्थितीत या विदेशी दारूसह वाहनाचा पंचनामा करण्यात आला. ही वाहने उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांच्या ताब्यात निवडणूक भरारी पथकाने अधिकच्या चौकशीसाठी दिली. ही विदेशी दारू मोटारीतून वहनाचे काम डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील संतोष किट्टना शेट्टी -(४०) हा करत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon