वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर, स्थानकात रक्ताचा सडा

Spread the love

वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर, स्थानकात रक्ताचा सडा

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई – मुंबईतील बांद्रा टर्मिनस रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये चढताना प्रवाशांची गर्दी वाढल्याने चेंगचेंगरी झाली आहे. वांद्रे- गोरखपूर एक्सप्रेस फलाट क्रमांक १ वर ही चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ९ प्रवाशी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची समजते. दुर्घटनेत जखमी झालेल्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वांद्रे टर्मिन्सवर सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यातील बहुतांश प्रवाशी हे दिवाळी व छट पुजेसाठी उत्तरप्रदेशात जात होते.

वांद्रे रेल्वे स्थानककीतल प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे रेल्वेत चढत असतानाच गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये काही प्रवाशी प्लॅटफॉर्मवर पडले. यामध्ये चेंगराचेंगरीमध्ये ९ प्रवासी जखमी झाले. दरम्यान, भाभा रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत जखमी झालेले प्रवाशी साधारण १८ ते ३० वयोगटातील आहेत. यातील इंद्रजित सहानी आणि नूर मोहम्मद शेख यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे. या दुर्घटनेनंतर तात्काळ पोलीस प्रशासनासह रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पहाटे ही दुर्घटना घडल्यानंतर काही काळासाठी हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे रिकामी करण्यात आला आहे. आता सध्या वांद्रे टर्मिन्समध्ये परिस्थिती नियंत्रणात असली तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांची नावे काय?

शबीर अब्दुल रेहमान

परमेश्वर गुप्ता

रविंद्र छुमा

रामसेवक रविंद्र प्रसाद प्रजापती

संजय कांगाय

दिव्यांशू यादव

मोहम्मद शेख

इंद्रजित शहानी

नूर शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon