मालवणीमध्ये १०१ ग्रॅम एमडीसह एका युवकाला अटक
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – मालवणी पोलिसांनी ८ लाख रुपये किमतीचे १०१ ग्रॅम मेफेड्रोन (अंमली पदार्थ) बाळगल्या प्रकरणी एका पाणीपुरी विक्रेत्याला अटक केली आहे. कैफ खान या २१ वर्षीय विक्रेत्याला मागच्या शुक्रवारी मालवणी येथून अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी सांगितले की, खान हा मादक पदार्थांचे वितरण करण्यासाठी मालवणीत आला होता आणि तो बांद्रा पूर्वेला लाल मातीची विक्री करतो. सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश साळुंखे व त्यांचे पथक मालवणी परिसरात गस्त घालत असताना त्याला अटक करण्यात आली. आणखी एका प्रकरणात, वांद्रे पोलिसांनी सोनू हाडोळे नावाच्या व्यक्तीला ११ लाख रुपयांचे एमडी बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याच्यावर फातिमा नावाच्या महिलेकडून ४१ ग्रॅम एमडी घेतल्याचा आरोप आहे. सदर आरोपीवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.