पालघर स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी
पालघरात विविध कारवायांत दारूसह ८० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पालघर / नवीन पाटील
आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ आचारसंहिता लागल्यानंतर, पालघर स्थानिक गुन्हे शाखा व पालघर पोलीस दलाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत त्यांना मोठे यश मिळाले आहे. अवैध दारू साठा व दारूबंदी अंतर्गत केलेल्या विविध कार्यांमध्ये सुमारे ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर दोन विनापरवाना शस्त्र बाळगण्या आरोपी वरती कारवाई करण्यात आली आहे. तसेच सुमारे पावणेपाच लाख किमतीचे विदेशी सिगारेट पकडण्यात पालघर स्थानिक पोलिसांना यश मिळाले आहे.
पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पालघर पोलिसांनी विनाशास्त्र बाळ गणाऱ्या आरोपींवरती कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. महामार्गावरील अवंढाणी गावाच्या हद्दीत मनोर पोलिसांनी केलेल्या कारवाईत परदेशी बनावटीच्या सिगारेटचे दहा बॉक्स जप्त करण्यात आले. सिगारेटच्या पाकिटांवर वैधानिक इशारा आणि छापील एमआरपी किंमत नसताना विदेशी सिगारेटची पाकिटांच्या विक्रीस मनाई असताना चार लाख ८३हजार रुपये किंमतीची विदेशी सिगारेट विक्री व वाहतूकीसाठी साठा बाळगल्या प्रकरणी दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील आवंढाणी गावाच्या हद्दीत हॉटेल सती माता समोर मुंबई वाहिनीवर दोन संशयित आरोपिंना ताब्यात घेऊन त्यांच्या कडील ट्रॉली बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये ४ लाख ८० हजार रुपये किंमतीचे परदेशीं बनावटीची सिगारेट आढळून आली. आरोपीत अयमन हुसेन इम्तियाज हुसेन (वय २७) रा. कामठीपुरा, मुंबई आणि दानिश नासिर हुसेन शेख (वय २५) रा. नागपाडा मुंबई यांना ताब्यात घेतले आहे.