उल्हासनगरातील हत्येचा उलगडा अवघ्या ८ तासात; हिललाइन पोलीसांची उत्तम कामगिरी
योगेश पांडे/वार्ताहर
उल्हासनगर – रात्री भररस्त्यात धारदार कैची ने करण्यात आलेल्या हत्येचा उलगडा उल्हासनगर मधील हिललाइन पोलीसांनी अवघ्या ८ तासात केली आहे.ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांचा टीमने केली असून या प्रकरणी आरोपी गौरव उडानशिवेच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. रात्री १० च्या सुमारास कैम्प नंबर ५ परिसरात कैलास कॉलोनी, दत्त मंदिर समोर ३५ वर्षीय भारत दूसेजा या व्यक्तीची धारदार कैचीने वार करून हत्या करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच हिललाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली.आणि पोलिस उपायुक्त सचिन गोरे,सहायक पोलिस आयुक्त सुरेश वराडे यांच्या नेतृत्वाखाली तपासाला गति दिली.तपासा दरम्यान आणि बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार ही हत्या गौरव उडानशिवे याने केल्याचे समीर आले.पोलीसांनी गौरवचे घर गठले तेव्हा दोन महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झालेला असून घाई गडबडीत टो बैग भरून पत्नी सोबत गेल्याची माहिती घरच्यांनी दिली.
या माहीतिच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप,पोलिस निरीक्षक (गुन्हे) सिद्देश्वर कैलाशे,उपनिरीक्षक गणेश मोरे, संग्राम मालकर, अंकुश सुरेवाड,अर्जन जाधव यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या.सकाळी ६ वाजण्याच्या आसपास अंबरनाथ परिसरातून आरोपी गौरव किरण उडानशिवे – २५ याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.आरोपिकडे विचारपूस केली असता १५ दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन भारत दूसेजा याची हत्या केल्याचे पोलीसांना सांगितले. आरोपी गौरव उडानशिवे याला कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायलयाने त्याला २९ तारखेपर्यंत पोलिस कोठडित ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे)सिद्देश्वर कैलाशे करत आहेत.