उल्हासनगरच्या शाळेतील शिक्षकांकडून ७ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; हिललाईन पोलिसांनी शिक्षकाला ठोकल्या बेड्या

उल्हासनगरच्या शाळेतील शिक्षकांकडून ७ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; हिललाईन पोलिसांनी शिक्षकाला ठोकल्या बेड्या

योगेश पांडे/वार्ताहर 

उल्हासनगर – महिलांवरील वाढते अत्याचार काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसून, आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उल्हासनगर शहरातील एका नामांकित शाळेतील पि.टी. शिक्षकांनी एका सात वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या प्रकरणी हिल लाईन पोलिसांनी तताडीनं शिक्षकावर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार या पि.टी. शिक्षकानं सात वर्षीय मुलीला ‘मला मिठी मार, माझी पप्पी घे नाहीतर तुला मारेल…’ असं बोलत धमकावलं. इतक्यावर न थांबता त्यानं या मुलीचं गालावर चुंबन घेऊन तिचा विनयभंग केला. घडल्या प्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पि.टी. शिक्षकाला अटक केली. विद्येच्या मंदिरात घडलेल्या या किसळवाण्या प्रकाराविषयी आता अनेक वर्गांतून संताप व्यक्त केला जात असून, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon