मुंबईत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचं स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यु तर दोघे जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – पश्चिम उपनगरातील मालाडमधील एका इमारतीचं काम सुरु असताना चार मजूर खाली कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कोसळलेल्या चार मजुरांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुपारी पाऊणच्या सुमारास ही घटना घडली. मालाड पूर्वेला असलेल्या गोविंद नगरातील हाजी बापू रोड परिसरात नवजीवन इमारतीचं काम सुरु आहे. बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळल्यानं दुर्घटना घडली.