पुण्यात गुन्हेगारांना मोकाट रान; नाना पेठेनंतर हडपसरमध्ये कोयत्याचे वार करुन फायनान्स मॅनेजरची हत्या

Spread the love

पुण्यात गुन्हेगारांना मोकाट रान; नाना पेठेनंतर हडपसरमध्ये कोयत्याचे वार करुन फायनान्स मॅनेजरची हत्या

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहे. पुण्यात बारा तासात दुसरा खून झाला आहे. रविवारी एकाच दिवशी दोघांची हत्या झाली आहे. मरण पावलेल्यांमध्ये एक माजी नगरसेवक तर दुसरा फायनान्सर आहे. फुरसुंगी सासवड रोड पोलीस ठाण्यापासून तीनशे मीटर अंतरावर ही घटना घडली आहे. कोयत्याने वार करुन निर्घृण खून करण्यात आला आहे. कुलकर्णी हा एक फायनान्स कंपनी चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे. व्याजाने दिलेल्या पैशांच्या वादातून ही हत्या झाली असण्याची शक्यता आहे. हडपसर भागात वासुदेव कुलकर्णी नावाच्या व्यक्तीची रात्री अडीच वाजता हत्या करण्यात आली आहे. कुलकर्णी हे पुण्यातील एका फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते. गाडीतळ परिसरात असलेल्या त्यांच्या घरासमोर शतपावली करताना अज्ञाताने धारदार शस्त्राने कुलकर्णी यांचा खून करण्यात आला आहे. ⁠ खुनानंतर परिसरात मोठी खळबळ‌ उडाली आहे. रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाची घटना ताजी असतानाच पुन्हा पुण्यात खूनाची घटना घडली आहे. खुनाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न सध्या खरंच ऐरणीवर आलाय.. पुण्यात एकाच दिवशी कोयत्याने वार करुन दोघांची हत्या करण्यात आली आहे. पुण्यात खून, दरोडेखोरी, चोऱ्या या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. मागील काही दिवसापासून अगदी क्षुल्लक कारणांवरून वाद झाला आहे. खून मारामारी होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon