नंदुरबारात बदलापूरची पुनरावृत्ती टळली ! मुलीने पालकांना वेळीच सांगितल्याने अनर्थ टळला, मुलींच्या सुरक्षेचं प्रश्न ऐरणीवर
नंदुरबार / प्रतिनिधी)
नंदुरबार – बदलापूर, सिन्नर तालुक्यामधील अत्याचाराच्या घटनांचा राज्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनांमुळे शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच भर म्हणून की काय, नंदुरबारमधील एका शाळेत असाच प्रकार एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या दक्षतेमुळे होताहोता वाचला. विशेष म्हणजे येथेही सफाई करमाचारच या प्रकरणातील संशयित आहे. या प्रकरणी संशयिता विरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलालेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील एका शाळेत सफाई कर्मचाऱ्याने पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवला. तसेच त्याने विद्यार्थिनीला शाळा सुटल्यानंतर एकांतात भेटण्याचे सांगितले. विद्यार्थिनीने तिच्या पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून संशयिता विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करीत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हा प्रकार शाळेचा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून शाळेकडून सफाई कर्मचाऱ्यावर कारवाई करून त्याला बडतर्फ करण्यात आले आहे. नंदुरबार शहरातील शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे पुन्हा एकदा शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या संदर्भात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरु केला आहे, अशी माहिती नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांनी दिली आहे.