सावत्र पित्याकडून १२ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; ओझर पोलीसांनी आरोपी पित्याला केली अटक
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – बदलापूर, पुणे अकोला वेगवेगळ्या ठिकाणी मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नसताना एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. वडिलांनीच आपल्या मुलीवर जबरदस्तीनं अत्याचार केला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सावत्र बापाने १२ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या तक्रारीनंतर सावत्र बापावर विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या ओझर इथे ही धक्कादायक घटना समोर आली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. माझ्या सावत्र वडिलांनी मला बकऱ्या चरायला आणण्याच्या बहाण्याने उसाच्या शेतात नेलं. खूप दूर घेऊन गेले. तिथे त्यांनी मला कपडे काढायला लावले. मला म्हणाले तुला सगळं करायचं आहे. मोठी दीदी झाल्यावर तुला सगळं करायचं आहे. मी पडायला लागले तर मला हातपाय धरुन त्यांनी ओढलं आणि उसाच्या बागेत नेलं जबरदस्ती केली’’, असं जबाब पीडितेनं पोलिसांना दिला आहे.
पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सावत्र बापाला अटक केली आहे. या घटनेमुळे ओझर परिसरात खळबळ उडाली आहे. १२ वर्षाच्या पीडितेनं धक्कादायक प्रकार सांगितला आहे. बदलापूर, पुणे, नाशिकच्या सिन्नर आणि आता नाशिकच्या ओझरमध्ये चिमुकल्या मुलींवर अत्याचर होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.