कल्याणमध्ये बांधकाम पुनर्वसन इमारत पाडताना खूप मोठी दुर्घटना टळली, केडीएमसी च्या निष्काळजीपणाचा कळस

Spread the love

कल्याणमध्ये बांधकाम पुनर्वसन इमारत पाडताना खूप मोठी दुर्घटना टळली, केडीएमसी च्या निष्काळजीपणाचा कळस

पांडुरंग कुंभार / कल्याण

कल्याण – येथील रामबाग लेन नं ४ येथील गणपती मंदिरच्या बाजूला असलेली सिद्धिविनायक या इमारतीचे तोडकाम सूरू असतानाच सदर इमारत पत्यासारखी रस्त्यावर कोसळली. सदर इमारतीचा काही भाग बाजूच्या परिसरातील झाडांवर पडल्याने ती झाडे चाळींवर कोसळली. यामुळे अनेक चाळीतील राहणाऱ्या रहिवाशांचे आर्थिक नुकसान झाले आहे, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी केडीएमसीचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. सदर इमारत रिडेव्हलपमेंट साठी तोडली जात होती. इमारत तोडतांना विकासक व कंत्राटदारांकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात आलेली नव्हती तसेच इमारत आतील बाजूस न पाडता वर्दळ असलेल्या रस्त्याच्या बाजूला पाडण्यात आल्याने मोठी दुर्घटना घडली असता असा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाचे विभागप्रमुख बाळा परब यांनी केला आहे.

इमारत कोसळताना परीसरात एकच घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते याच रस्त्यावरून शालेय विद्यार्थी शाळेत जात असतात, शाळा सुटन्याच्या वेळेत ही घटना घडल्याने तसेच परीसरात धुळीचे लोट उडाल्याने लोकांमध्ये संतापाची भावना पहावयास मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon