५० हजार रूपये बक्षीस घोषीत केलेल्या खुनाच्या गुन्हयातील फरार दोन आरोपींना ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून अटक

Spread the love

५० हजार रूपये बक्षीस घोषीत केलेल्या खुनाच्या गुन्हयातील फरार दोन आरोपींना ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून अटक

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे – एसटीएफ पोलीस, उत्तरप्रदेश यांचेकडून खंडणी विरोधी पथकास माहिती मिळाली की, मेजा पोलीस स्टेशन, प्रयागराज, उत्तरप्रदेश येथील गु.र.नं. ३६५/२०१७ भादवि कलम ३०२,५०४ ५०६ मधील ७ वर्षापासून फरारी असलेले आरोपी १) मोनु शुक्ला, २) रजत शुक्ला हे फरार असून त्यांचे विरूद्ध उत्तरप्रदेश सरकार कडून प्रत्येकी ५० हजार रूपये बक्षीस जाहीर झाले आहे. सदरचे आरोपी सध्या वसंत विहार, ठाणे परिसरात लपुन राहत असल्याची माहिती मिळाली. सदर आरोपींना अटक करण्यासाठी त्यांनी पोलीस मदत मागितली. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली असता त्यांनी खातरजमा करून योग्य ती कारवाई करण्यासाठी आदेश दिल्याने खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी एसटीएफ उत्तरप्रदेश यांचेकडून सदर आरोपींची इत्यंभुत माहिती मिळवुन त्यांचे मोवाईल फोन नंबर मिळवुन त्याचे सीडीआरचे तांत्रीक विश्लेषण केले असता सदर आरोपी हे निळकंठ वुडस, मुल्ला वाग, ठाणे येथे असल्याची माहिती मिळाली असता पथकाने सदर ठिकाणी जावुन तेथील परिसरातील रहिवाशांकडे गोपनियरित्या चौकशी केली करून सदर आरोपी निळकंठ वुडस समोरील चौकात, मुल्ला वाग, ठाणे येथे असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी पोलीसांनी आरोपींचा शाधे घेतला असता दोन व्यक्ती संशयास्पदरित्या फिरतांना आढळून आले त्यांना सदर पथकाने ताव्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी सुरूवातील उडवाउडवीची उत्तरे देवुन खरी माहिती सांगण्याचे टाळले. सदर संशयितांना जवळील चितळसर पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्याकडे आणखी तपास केला असता त्यांनी त्यांचे नाव पत्ता १) मोनु उर्फ विभास उर्फ प्रशांत कपिल शुक्ला, वय ३० वर्षे, २) रजत उर्फ प्रभात कपिल शुक्ला वय २६ वर्षे, दोन्ही रा. रूम नं. प्लॉट नं. १२४/१४ डी, पहिला माळा, जुना म्हाडा वसाहत, वसंत विहार, ठाणे, मुळ रा. ग्राम अठखरीया, पोस्ट शुक्लपुर, थाना मेजा, जिल्हा प्रयागराज, उत्तरप्रदेश असे सांगून त्यांचा मेजा पोलीस स्टेशन, गु.र.नं. ३६५/२०१७ भादवि कलम ३०२,५०४ ५०६ मधील मृत्यू पावलेला व्यक्ती शंकर शुक्ला याच्या खुनाच्या गुन्हयात सहभाग असल्याची कबुली दिली. सदर आरिपीना दि. १६/०८/२०२४ रोजी २२:१५ वा ताब्यात घेवुन एसटीएफ, प्रयागराज पोलीस, उत्तरप्रदेश यांचे ताव्यात पुढील कारवाईकरीता सुपुर्द केले आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंजावराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२, गुन्हे शाखा, राजकुमार डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली एसटीएफ पोलीस, प्रयागराज, उत्तरप्रदेश कडील पोउनि/धर्मेंद्र सिंह, पोउनि/रणेंद्र सिंह, मुख्य आरक्षी अभिशेक मिश्रा, मुख्य आरक्षी विकास तिवारी, मुख्य आरक्षी अजयकुमार यादव, आरक्षी किसनचंद, आरक्षी चालक रविकांत सिंह तसेच खंडणी विरोधी पथकाचे वपोनि/श्री. मालोजी शिंदे, सपोनि/भुषण कापडणीस, सपोनि / सुनिल तारमळे, पोउनि / विजयकुमार राठोड, पोउनि/सुभाष तावडे, सपोउनि/कल्याण ढोकणे, सपोउनि/संजय बाबर, पोहवा/योगीराज कानडे, पोहवा/संदिप भोसले, पोहवा/संजय राठोड, मपोहवा/शितल पावसकर, मपोशि/मयुरी भोसले, पोशि/तानाजी पाटील, पोशि/अरविंद शेजवळ, चापोना/भगवान हिवरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon