खळखळून हसवणारा अभिनेता काळाच्या पडद्याआड, जेष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन
मुंबई – मराठी सिनेसृष्टीतुन एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठी सिनेसृष्टीत चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं. मागील काही दिवसांपासून ते कर्करोग या गंभीर आजाराशी झुंज देत होते. आज शनिवारी सकाळी ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी जगाचा निरोप घेतला. विजय कदम यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
दिग्गज अभिनेते विजय कदम यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. विजय कदम मागील दीड वर्षांपासून कर्करोगाची झुंज देते होते. त्यांच्यावर मागील काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. आज शनिवारी सकाळी विजय कदम यांनी जगाचा निरोप घेतला.
विजय यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या जाण्याने हरहुन्नरी कलाकार गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विजय कदम यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.