चिंचवडमध्ये पुन्हा हिट अ‍ॅण्ड रन; घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल, सांगवी पोलिसांकडून कार चालकाचा शोध सुरु

Spread the love

चिंचवडमध्ये पुन्हा हिट अ‍ॅण्ड रन; घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल, सांगवी पोलिसांकडून कार चालकाचा शोध सुरु

योगेश पांडे / वार्ताहर 

पिंपरी- चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण झाल्याचं समोर आलं आहे. घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास अपघात झाला. तक्रार दाखल नसल्याने ताब्यात घेतलेल्या कार चालकाला सांगवी पोलिसांनी सोडून दिले. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कार चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव भागात सात ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास भरधाव चारचाकी आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. चारचाकी चालकाने दुचाकीसह चालकाला काही फूट अंतरावर फरफट घेऊन गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या घटनेत दुचाकी चालकासह इतर एक जण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेच्या दिवशी कार चालकाविरोधात तक्रार नसल्याने ताब्यात घेतलेल्या कारचालकाला सांगवी पोलिसांनी सोडून दिले आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगवी पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेतला नाही. परंतु, सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर आणि माध्यमांपर्यंत बातम्या आल्यामुळे सांगवी पोलीस तत्परतेने कारचालकाचा शोध घेताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon