बांग्लादेशात हिंदू धोक्यात, इस्कॉनचं मंदिर जाळलं, हिंदुंना घरातून बाहेर काढून बेदम मारहाण
योगेश पांडे / वार्ताहर
ढाका – बांग्लादेशात हिंसाचार माजला आहे. जाळपोळ, तोडफोड सुरु आहे. समाजकंटकांनी अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं आहे. बांग्लादेशात हिंदुंना टार्गेट केलं जातय. जमाव निवडून-निवडून हिंदुंना टार्गेट करतोय. घरांना आगी लावल्या जात आहेत. दुकानं लुटणं सुरु आहे. बांग्लादेशातील मेहरपुर येथील इस्कॉन मंदिराचे फोटो समोर आलेत. समाजकंटकांनी तोडफोड केल्यानंतर मंदिर पेटवून दिलं. बांग्लादेशी माीडिय द डेली स्टारच्या रिपोर्टनुसार २७ जिल्ह्यांमध्ये हिंदुंच्या घरांना आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आलय. महागडं सामान लुटण्यात आलं. मंदिरांवर हल्ले करण्यात आले. रिपोर्टनुसार, लालमोनिरहाट सदर उपजिल्ह्यात धार्मिक हिंदू कार्याशी संबंधित पूजा समितीचे सचिव प्रदीप चंद्र रॉय यांच्या घरी तोडफोड करुन लुटमार करण्यात आली. दंगेखोरांनी नगरपालिका सदस्य मुहिन रॉय यांच्या कॉम्प्युटर दुकानात तोडफोड करुन आग लावली. कालीगंज उपजिल्ह्यातील चंद्रपुर गावात ४ हिंदू कुटुंबांच्या घरात तोडफोड आणि लुटमार करण्यात आली. हातिबंधा उपजिल्हा पुरबो सरदुबी गांवात १२ हिंदुंची घर पेटवून देण्यात आली. बांग्लादेशी मीडियानुसार पंचगढमध्ये अनेक हिंदु घरांमध्ये तोडफोड आणि लुटमार करण्यात आली. ओइक्या परिषदेचे महासचिव मोनिंद्र कुमार नाथ यांच्यानुसार, असं कुठला जिल्हा नाहीय, की जिथे हिंदुंच्या घरांवर हल्ला झालेला नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यातून हल्ल्याच्या बातम्या येत आहेत.
रिपोर्टनुसार हिंदुंना घरातून बाहेर काढून मारहाण करण्याय येत आहे. दुकानं लुटण्यात येत आहेत. या हल्ल्यामुळे बांग्लादेशातील अल्पसंख्यांक हिंदू समाज घाबरला असून चिंतेमध्ये आहे. दिनाजपुर आणि दूसऱ्या उपजिल्ह्यात १० हिंदुंच्या घरांवर हल्ले झाले आहेत. हल्लेखोरांनी रेलबाजारहाट येथे एक मंदिरात तोडफोड केली. बांग्लादेशातील हिंदू-बुद्ध ईसाई परिषदेचे सरचिटणीस उत्तम कुमार रॉय यांनी सांगितलं की, खानसामा उपजिल्ह्यात तीन हिंदुंच्या घरावर हल्ला करण्यात आला. लक्ष्मीपुर येथे गौतम मजूमदार यांनी सांगितलं की, संध्याकाळी ७. ३० वाजता २००-३०० पेक्षा जास्त हल्लेखोरांनी त्यांच्या दोन मजली इमारतीला आग लावली.