वाघाच्या कातडीची तस्करी करणारी टोळी जेरबंद

Spread the love

वाघाच्या कातडीची तस्करी करणारी टोळी जेरबंद

योगेश चौधरी / जळगाव

जळगाव – वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीला कस्टम विभागाने शनिवारी नशिराबाद टोल नाक्यावर पकडले. त्यांच्याकडून वाघाची कातडी जप्त करण्यात आली असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की दि. २६ रोजी जळगांव वनपरिक्षेत्रातील नशिराबाद टोल नाका येथे कस्टम विभागाला मिळलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यानी केलेल्या कार्यवाही दरम्यान वाघ या प्राण्यांची कातडी ही आरोपी १) अजवर सुजात भोसले (३५) रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर ह.मु. चांगदेव २) मोहमंद अतहर खान (५८) रा. भोपाल जि. भोपाल (मध्यप्रदेश) ३) नदीम गयासुद्दीन शेख (२६) रा. अहमदनगर जि. अहमदनगर ४) ककंगनाबाई अजवर भोसले (३०) रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव ५) तेवाबाई रहीम पवार (३५) रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव ६) रहिम रफिक पवार (४०) रा. हलखेडा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव यांच्या ताब्यातुन जप्त केली.

या गुन्हयात वापरण्यात आलेले मोबाईल ०५ व मोटार सायकल संख्या-०२ व इतर साहित्य कस्टम विभागा यांच्या मार्फत जप्त करण्यात आले. पुढील तपासासाठी कस्टम विभाग यांनी कारवाई बाबत उपवनसंरक्षक, जळगांव वनविभाग जळगांव यांना कळविले असता, सदर माहितीच्या आधारावर वरील सहा आरोपीना जळगांव वनविभागाकडून अटक करण्यात आलेली आहे.सदर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon