पैशांचे आमिष दाखवून धर्मपरिवर्तन करणाऱ्या दलालांना ठेचून काढू – संजय सल्लेवाड

Spread the love

पैशांचे आमिष दाखवून धर्मपरिवर्तन करणाऱ्या दलालांना ठेचून काढू – संजय सल्लेवाड

अजीज खान / ढाणकी

ढाणकी – शहरातील गरीब परिवारातील काही लोकांना बाहेरगावातील ख्रिश्चन दलाल पैश्याचे आमिष देऊन धर्मपरिवर्तन करत असल्याची माहिती येथील मसनजोगी समाजाचे अध्यक्ष व पत्रकार संजय सल्लेवाड यांना मिळाली होती, त्याच अनुषंगाने परिसरातील मसनजोगी समाजातील सर्व प्रमुख सदस्यांची बैठक ढाणकी येथील दत्तमंदिरावर आयोजित केली होती, या बैठकीला परिसरातून जवळपास शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, शेकडो कार्यकर्त्यांनी एकमुखाने समाजातील एकाही सदस्याला ख्रिसचन होऊ देणार नाही असा ठराव पास करून घेतला, व तसेच पैशांच्या अमिषाला बळी पडून ज्यांनी धर्मपरिवर्तन केले होते त्या सर्व परिवाराला परत आपल्या हिंदू धर्मात आणले,या प्रसंगी संजय सल्लेवाड यांनी बैठकीला संबोधित करतांना समाजातील कोणत्याही सदस्यांनी आपल्या जातीचा अभिमान बाळगून, समाजातील प्रत्येक सदस्याला धर्मपरिवर्तन करण्यापासून रोखले पाहिजे, पैशांच्या अमिषाला बळी पडू नये, तसेच समाजाला तोडणाऱ्या लक्ष्मण नावाच्या दलालाला समाजात थारा देऊ नये, त्याला समाज तोडण्याची शिक्षा मिळाली पाहिजे, असे प्रबोधन करून समाजाच्या संघटितपणाला अजून मजबूत करून राज्यस्तरावरील समाजाचे संघटन उभे करण्याचा संकल्प करण्यात आला,रा स्व संघांचे तालुका सहकार्यवाह दिगंबर बल्लेवार यांनी बैठकीला संबोधित करतांना धर्मपरिवर्तन ही समाजाला लागलेली कीड आहे, या किडीपासून आपल्याला आपल्या समाजाचे सरंक्षण करण्याची गरज असून, आपला समाज तोडणाऱ्या व्यक्तीपासून सावध राहण्याची गरज आहे, छत्रपती संभाजी महाराजानी आपल्या शरीराचे एक एक अवयव तोडून टाकल्यानंतर सुद्धा धर्मपरिवर्तन केले नाही अशा शंभुमहाराजांचे आपण वारसदार आहोत, मग थोडया पैशांसाठी आपला धर्म व जात आपण सोडणार का,याच्यासोबत सर्वच जातीतील प्रमुखांनी ख्रिश्चनदलालापासून आपल्या समाजाचे सरंक्षण करावे असे आवाहन करण्यात आले, समाज अध्यक्ष संजय सल्लेवाड यांनी मसणजोगी समाजाच्या सर्व सदस्यांच्या वतीने तीन ठरावं मंजूर करून घेण्यात आले, १ मसणजोगी समाजातील कोणत्याही गरीब श्रीमंत सदस्यांचे धर्मपरिवर्तन सहन करणार नाही, २ समाज तोडणाऱ्या व्यक्तीला ठेचून काढल्याशिवाय वा दंड दिल्याशिवाय राहणार नाही, ३ समाजांनी अशा घटना सर्व सदस्यांपर्यंत जागरण करणाच्या हेतूने पोहचवून समाज बांधवाना सजग करत राहणार, यावेळी उमरखेड, किनवट, साखरा, मनाठा, दारव्हा, दिग्रस, मानोरा, मांडवी, अंदेगांव, देव्हाळा, हिंगोली इत्यादी गावातील मसणजोगी समाजातील प्रमुख शिलेदारांची उपस्थिती होती, या बैठकीची व्यवस्था ढाणकीतील मसणजोगीसमाज बांधवानी पार पाडली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon