घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली; वागळे इस्टेट परिसरातील धोकादायक होर्डिंग हटवले

Spread the love

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली; वागळे इस्टेट परिसरातील धोकादायक होर्डिंग हटवले

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली आहे. ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असलेलं एक भलं मोठं होर्डिंग धोकादायक बनलं होतं. हे होर्डिंग पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. मात्र हे होर्डिंग वेळेत हटवण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. जेसीबीच्या मदतीनं हे होर्डिंग हटवण्यात आलं आहे.यामुळे काही काळ वागळे इस्टेट परिसरात वाहतूक थांबवण्यात आली होती. सतत पडणारा पाऊस आणि वाऱ्यामुळे वागळे इस्टेट परिसरात असलेलं एक भलंमोठं होर्डिंग धोकादायक बनलं होतं. हे होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. लोखंडी होर्डिंग धोकादायक झाल्याची माहिती मिळताच टीएमसी प्रशासनानाकडून तातडीनं कारवाई करण्यात आली. टीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या मदतीनं हे धोकादायक झालेलं होर्डिंग हटवलं. यामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेत अनेकांनी आपला जीव गमावला तर अनेक जण जखमी झाले. हे भलं मोठं होर्डिंग एका पेट्रोल पंपावर कोसळलं. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी असल्यांनं मोठी जीवितहानी झाली. काही कळायच्या आतच हे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं. त्यामुळे अनेक जण त्याखाली दबले गेले. या अपघातानंतर मुंबईतील धोकादायक होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आता होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon