पुण्यातील मावळ तिहेरी हत्याकांडने हादरलं, विवाहबाह्य संबंधातून गर्भवती महिलेचा मृत्यू, मुलांना जिवंत नदीत फेकलं

Spread the love

पुण्यातील मावळ तिहेरी हत्याकांडने हादरलं, विवाहबाह्य संबंधातून गर्भवती महिलेचा मृत्यू, मुलांना जिवंत नदीत फेकलं

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधातून महिला प्रियकराकडून गर्भवती राहिली होती. मात्र गर्भपात करताना तिचा डॉक्टरांच्या हरलगर्जीपणमुळे मृत्यू झाला. आरोपी प्रियकराने आपल्या मित्राच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याासाठी मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला. निर्दयीपणाचा कळस म्हणजे आरोपींनी हे प्रकरण समोर येऊ नये म्हणून मृत्यू झालेल्या महिलेच्या दोन्ही मुलांनाही जिवंत पाण्यात फेकून दिलं. आईसह मुलांच्या तिहेरी हत्याकांडने मावळ हादरलं असून तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपींनी बेड्या ठोकल्यात. विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचं गर्भपात करताना मृत्यू झाला अन तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही मुलांना नदीच्या वाहत्या प्रवाहात जिवंत फेकून देण्यात आलं आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आलीये. या प्रकरणी प्रियकर आणि त्याच्या मित्राला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही संतापजनक घटना ९ जुलैला घडली. ६ जुलैला गर्भवती प्रेयसीला आणि तिच्या ५ आणि २ वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली येथे गेला.

तेथील अमर रुग्णालयात प्रेयसीचं गर्भपात करण्यात आलं, मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं प्रेयसीचा ८ जुलैला मृत्यू झाला. मग गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गाईकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला. मग गजेंद्र आणि रविकांतने ९ जुलैच्या अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला. नंतर प्रेयसीची दोन्ही मुलं रडू लागली. आता या दोघांमुळं आपलं बिंग फुटेल, या भीतीने निर्दयीपणाचा कळस गाठला. कोणतीही दया-मया न दाखवता त्या दोन्ही मुलांना ही त्याच नदीच्या प्रवाहात जिवंत फेकून दिलं. दुसऱ्या दिवसांपासून हे दोघे ही काही घडलंच नाही, असं वावरू लागले. दरम्यानच्या काळात प्रेयसीसोबत तिच्या कुटुंबीयांचा संपर्क होत नसल्यानं, तिच्या कुटुंबीयांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांत तिघे हरवल्याची तक्रार दिली. मग पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. प्रेयसीला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रने मित्र रविकांतशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलल्याचं तपासात समोर आलं. या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली, मात्र दोघे ही उडवाउडवीची उत्तरे देत होती. शेवटी पोलिसी खाक्या दाखवण्यात आला अन दोघांनी घडला प्रकार कबूल केला. तळेगाव पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाई सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon