पैशांच्या वादातून व्यापाऱ्याचे अपहरण; एल. टी. मार्ग पोलीसांनी १२ तासाच्या आत केली व्यापाऱ्याची सुटका, ३ आरोपीना ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – पैशांच्या वादातून चीराबाजार येथील एका व्यापाऱ्याला ४ जणाकडून मारहाण करत अपहरण करण्याची माहिती मुख्य नियंत्रण कक्षाकडून एल. टी. मार्ग पोलिस ठाण्याला मिळाली.प्राप्त संदेश वरून अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचा मित्र प्रत्यक्षदर्शि साक्षीदार कार्तिक सिंह राठौड़ यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तात्काळ परिमंडळातील अधिकाऱ्यांचे पथक तयार करून वपोनि एल. टी. मार्ग पोलिस ठाणे यांच्या आधीपत्याखाली पो.नि. घाडीगांवकर,सपोनि भंडारे, पोउनि कांबळे तसेच डी.बी. मार्ग पोलिस ठाण्याचे सपोनि पाटिल व पायधुनी पोलिस ठाण्याचे पोउनि वायाळ असे पथक तयार करून पीड़ित व्यापारी आणि आरोपीतांचा शोधकाम रवाना केले.
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीसांनी वापरलेल्या वाहनांचा मार्ग काढत त्यांच्या कोंढवा, पुणे येथील पत्यावर तपासी पथक पोहोचले.सदर ठिकाणी पोलीसांनी अतिशय कौशल्याने तपास करत सापळा रचुन १२ तासाच्या आता गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह तीन आरोपीनां अटक करून पीडीत व्यापारी हेमंत कुमार रावल – ३० यांची सुखरूप सुटका केली. सदर गुन्ह्यात तपासादरम्यान आणखी तीन आरोपिंची सहभागिता निष्पन्न झाली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.