मोटार सायकल चोराकडुन ८ मोटार सायकल हस्तगत, भडगांव पोलिसांची कारवाई

Spread the love

मोटार सायकल चोराकडुन ८ मोटार सायकल हस्तगत, भडगांव पोलिसांची कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

 जळगाव– घरासमोर लावलेली मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार भडगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली. पंडित झिपरु बोरसे वय. ४७ धंदा शेती रा. गिरडें ता.भडगाव याच्या फिर्यादवरुन अज्ञांत आरोपी विरुध्द गुन्हा रजि. नं. ०९/२०२३ भादवी कलम ३७९ प्रमाणे नोंद करण्यात आला.या गुन्ह्याचा तपास हा पो.हे.कॉ/७२ किरण पाटील यांच्याकडे देण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी जळगाव, अपर पोलीस अधिक्षक, कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ, सहायक पोलीस अधिक्षक अभियसिह देशमुख, चाळीसगांव भाग यांचे सुचना व मार्गदर्शनानुसार सदर गुन्ह्याचा तपास करीत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदर गुन्ह्यातील चोरी केलेली मोटार सायकल ही अमोल शांताराम पाटील रा. गिरड ता.भडगाव याने चोरी करुन घेवुन गेला असल्याने त्यास ताब्यात घेवुन गुन्ह्यातील चोरी केलेली मोटार बाबत त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिलेली असल्याने त्यास अटक करण्यात आली. सदर आरोपीस न्यायालयात हजर करुन त्याची ४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेवुन विचारपुस केली असता त्याने सदर दाखल गुन्ह्यातील चोरुन नेलेल्या मोटार सायकल व्यतिरीक्त गुजरात, मध्यप्रदेश राज्यातुने व पाचोरा परिसरातुन अजुन मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीवर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सदरची कार्मागरी पोलीस अधिक्षक श्री माहेश्वर रेड्डी, जळगाव, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, चाळीसगाव परिमंडळ, सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पो. उपनिरी. शेखर डोमाळे, पोहेको ७२ किरण रविंद्र पाटील, पोहेको १४३८ हिरालाल नारायण पाटील, पोहेकाँ/२८८० निलेश भालचंद्र ब्राम्हणकर, पोना ३२० मनोहर जिवन पाटील, पोको १६७६ सुनिल जयसिंग राजपुत, पोको १९३२ प्रविण परदेशी यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास पोहेकी ७२ किरण रविंद्र पाटील हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon