यावल शहरातील बेशिस्त वाहतूक आणि चिथावणीखोर गुन्हेगारांचा कचरा साफ करणार – पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर 

Spread the love

यावल शहरातील बेशिस्त वाहतूक आणि चिथावणीखोर गुन्हेगारांचा कचरा साफ करणार – पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर 

सुरेश पाटील / प्रतिनिधी

यावल – जातीय सलोखा,कायदा व सुव्यवस्था कायम राहणे कामी यावल पोलीस स्टेशन हद्दीतील आणि शहरातील चिथावणीखोर असलेल्या आणि भांडण तंटे करणाऱ्या गुन्हेगारांचा कचरा साफ करणार असल्याची माहिती यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी दिली. गुरुवार दि. १८ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता यावल पोलीस स्टेशन आवारात शांतता कमिटी सदस्यांची एक महत्त्वपूर्ण मीटिंग संपन्न झाली. त्या बैठकीत बोलताना पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी सांगितले की, यावल शहराची कायदा व सुव्यवस्था, जातीय सलोखा अबाधित राहणे कामी मी शहरातील गुन्हेगारीचा कचरा साफ करणार असून त्यासाठी चांगल्या प्रकारचा मोठा कायद्याचा खराटा हाती घेतला आहे आणि कारवाई करताना कोणाचीही हायगय केली जाणार नाही असे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी शांतता कमिटी सदस्याच्या माध्यमातून संपूर्ण यावल शहराला इशारा दिला आहे.

रविवार दि.२१ जुलै २०२४ रोजी यावल शहरात सालाबाद प्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त श्री महर्षी व्यास व श्रीराम मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि याच दिवशी यावर्षी योगायोगाने दुग्ध शर्करा योग निर्माण झाला असून मुस्लिम बांधवांचा पेहरन- ए शरीफ कार्यक्रमाची भव्य अशी मिरवणूक सालाबाद प्रमाणे दुपारी २ वाजता त्यांनी ठरवलेल्या निश्चित अशा मार्गाने यावल शहरातून काढण्यात येणार आहे. पेहरन शरीफ कार्यक्रम आयोजकांनी हिंदू मुस्लिम बांधवांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि आणि यावल शहरतील कायदा सुव्यवस्था, जातीय सलोखा कायम राहावा म्हणून सर्व समाज बांधवांच्या भावनांचा आदर करीत मुस्लिम बांधवांनी यावर्षी पेहरन शरीफ मिरवणूक जास्त वाजा गाजा न करता ( वाजंत्री न लावता ) काढण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या या निर्णयाचे शासनातर्फे व यावल शहरातील नागरिकांनी कौतुक करून अभिनंदन केले. शांतता कमिटीत ज्येष्ठ पदाधिकारी हाजी शब्बीर खान सेट, हाजी इक्बाल शेठ, करीम मेंबर,भगतसिंग पाटील, गोपालसिंग पाटील, प्राध्यापक मुकेश येवले, डॉ.निलेश गडे, उमरअली कच्ची, विजय सराफ,पराग सराफ, मो.हबीब मो.याकूब, सय्यद युनूस सय्यद यूसूब, शेख हबीब, रहेमान खाटीक, कयूम गाणी पटेल, नितीन सागर, विवेक सोनार, अमोल भिरुड इत्यादी शांतता समिती सदस्य उपस्थित होते. शांतता समिती सदस्य रजिस्टरला ज्याप्रमाणे नावाची नोंदणी आणि स्वाक्षरी आहे त्याप्रमाणे नावे नमूद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon