शाळा सोडण्याचे प्रमाण पत्र व गुणपत्रिका न दिल्याने शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात तीव्र निर्दशने
मुंबई – शाळा व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कैलास आखाडे यांनी दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सागर कैलास आखाडे हा विध्यार्थी २०२३-२०२४ मध्ये कला विद्यालय म्हडा मालवणी मालाड या शाळेचा विध्यार्थी होता तो दहावी वर्गाला पास झाला असून पुढील शिक्षण घेण्यासाठी त्याला गुणपत्रिका व शाळा सोडण्याचे प्रमाणपत्राची आवश्यक आहे.
कला विद्यालय या शाळेची सागर आखाडे यांची इयत्ता दहावी वर्गाची २३८००/-रु. फी बाकी असल्यामुळे शाळा त्याला वरील आवश्यक पेपर देत नाही. सागर चे वडील कैलास गुलाब आखाडे यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ते शाळेची फीस भरू शकत नाहीत म्हणून त्यांनी शाळेला विनंती केली आहे की मला दोन महिन्याचा कालावधी देण्यात यावा व माझ्याकडे सध्या ५ हजार रु.आहेत ते आपण घ्यावे. पण शाळा ऐकत नसून मनमानी कारभार आवाजवी फी मुळे शाळेचे संस्थापक पाटील हे अजिबात ऐकायला तयार नाहीत यामुळे सागरआखाडे या विध्यार्थी याचे पुढील शिक्षण धोक्यात येऊ नये किंवा सागर आखाडे या विध्यार्थी याच्या वर त्यांच्या पालकांवर आर्थिक मागास्त असलेल्या जाणीवची शाळेने त्यांना दाखवून दिल्यामुळे या अवमानाचा परिणाम होऊ नये, त्यांना व त्यांच्या परिवाराला योग्य न्याय मिळावा. खासदार ऍड भाई चंद्रसेखर आजाद रावण राष्ट्रीय अध्यक्ष आजाद समाज पार्टी यांच्या आदेशानुसार सदर अनुषंगाने कला विद्यालय शाळेवर दि, १०/७/२०२४ रोजी वार बुधवार वेळ सकाळी ११ : वाजता शाळेवर तीव्र निर्दर्शने व धरणे आंदोलन काढण्यात येणार आहे. यामध्ये नेहाताई शिंदे महाराष्ट्र अध्यक्ष महिला आघाडी कैलास जैस्वार मुंबई अध्यक्ष व मार्गदर्शक नेतृत्व : सुरेश वाघमारे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष.यांच्या मार्गदर्शन खाली आजाद समाज पार्टी उत्तर मुंबई जिल्हा सरचिटणीस नाथा खरात यांच्या व मालाड तालुका अध्यक्ष कैलास आखाडे यांनी तीव्र धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे तरी विभागातील सामाजिक संस्था संघटना यांनी सहभाग दर्शवावा असे आवाहन करण्यात आले आहे