अमरावतीमध्ये पतीने केली पत्नीची झोपेतच हत्या! घुसली कामनापूर येथील घटना
पोलीस महानगर नेटवर्क
अमरावती – घुसली कामनापूर येथे गुरुवारी सकाळी पतीने झोपेतच कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घुसली कामनापूर येथील आरोपी मधुकर नारायण कतलाम वय (६०) वर्ष असून पत्नीचे नाव लता मधुकर नारायण कतलाम वय (५२) असे मृतक महिलेचे नाव होते. सदर हत्या झालेल्या महिलेचे दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबध होते. ती त्या पुरुषासोबत गेल्या दोन आठवड्यांपासून राहत होती. मयत महिला कामनापूर येथे घरी परतली असता तिने पती आरोपी मधुकर कतलाम याला दुसऱ्यांदा लग्न केल्याचे सांगितले, या कारणावरून दोन्ही पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. काल रात्री ती घरात गाढ झोपली असताना दुसरं लग्न केल्याचा राग मनात धरून तिचा मारेकरी पती मधुकर याने तिची मानेवर, डोक्यावर व चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून तिला ठार केले.
सदर घटना मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास घडल्याने सकाळी घटना उघडीस आली. पोलिसांना माहिती मिळताच एसएचओ रामेश्वर धौंडगे व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी घटनास्थळी भेट घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. पुढील तपास पोलीस ठाण्याचे अधिकारी रामेश्वर धोंडगे यांच्यासह पवन अलोणे, सचिन गायधने, संदेश चव्हाण, गौतम गवळे हे घटनास्थळी तैनात असून मृतदेहाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली. घुसली येथील पोलीस पाटील कु. मीना चंद्रशेखर कडू यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजि. नं. १९०/२०२४ कलम ३०२ भादंवि प्रमाणे दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.