वाहवा ! कोपरखैरणे पोलीस; चोरीला गेलेला मोबाईल थेट दुबईतून परत आणण्यात यश
योगेश पांडे – वार्ताहर
नवी मुंबई – मोबाईल चोरीच्या घटना आजकाल अतिशय सामान्य झाल्या आहेत. हे चोर अतिशय सहज चालता-चालताही लोकांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेतात. अशा घटनांमध्ये अनेकदा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळण्याची आशाही नसते. तर, कधीकधी तो परत त्याच्या मालकापर्यंत पोहोचतोच. कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतूनही काही मोबाईल चोरीला गेले होते. चोरीला गेलेल्या मोबाईलपैकी जवळपास ३१ मोबाईल शोधण्यात आले आहेत ३१ मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले. कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीतील चोरी झालेल्या मोबाईलची तांत्रिक माहिती वेबसाईटवर टाकण्यात आली. वरिष्ठांच्या आदेशानुसार दिवस-रात्र मेहनत घेऊन ३१ मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले आहेत. तांत्रिक सखोल तपासनंतर हे मोबाईल शोधण्यात आले.
तांत्रिक सखोल तपासनंतर एक मोबाईल हा दुबई येथे असल्याचं समोर आलं. तर दुसरा मोबाईल हा उत्तर प्रदेशमधून हस्तगत केला आहे. आपला मोबाईल आपल्याला परत मिळाल्याने मूळ मालकांनी आनंद व्यक्त करत कोपरखैरणे पोलिसांचे आभार मानले आहेत.