मनमाडमध्ये शिक्षक निवडणुकीत खुलेआम पैशांचं वाटप; पोलिसांची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही पैसे वाटपामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. जळगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या दौ-यानंतर येथे पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यानंतर आता मनमाड येथे विवेक कोल्हे यांच्या पत्रकाबरोबर पैसे वाटप करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बुधवारी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान आहे. पण, मतदानाच्या अगोदरच पोलिस आणि तहसील विभागाच्या पथकाने मोठी कारवाई मनमाड येथे केली आहे. मतदारांना देण्यासाठी पैशांचे पाकीट पोलिसांनी जप्त केले आहे.
गुप्त माहिती मिळाल्या नंतर पोलिसांनी गणेश नगर भागात छापा मारून ही कारवाई केली. पाकीट सोबत पत्रक व दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या निवडणुकीत पैसे वाटपाबरोबरच पैठणी, साड्या, नथ, सफारी ड्रेस असे वाटप उमेदवारांनी केले आहे. त्याचप्रमाणे दारुच्या पार्ट्याही शिक्षकांना देण्यात आल्या. त्यामुळे शिक्षकांची निवडणुकीत होत असलेल्या या गैरप्रकारावर पालकांनी सुध्दा संताप व्यक्त केला आहे