पुण्यात पुन्हा ‘उडता पंजाब’, नामांकित हॉटेल एल ३ मध्ये ड्रग्ज सेवनचं स्टिंग ऑपरेशन
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे– पुण्यातून कोट्यवधींचे ड्रग्स पकडले गेले असताना आता थेट सर्रासपणे विक्री करतानाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. फर्ग्युसन रस्त्यावरील एका नामांकित एल ३ हॉटलेमधून सर्रास ड्रग्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले आहेत तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याने अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. पुण्यात कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पब, हॉटेल आणि बारवर पोलीस कारवाई सुरु झाली होती. हॉटेल्सला अल्पवयीन मुलांना दारू देण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच दारूच्या दुकानातूनही २१ वर्षांखालील मुलांना दारूविक्री केली जात नव्हती. मात्र आता सरार्सपणे मुलांना ड्रग्स दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन नक्की काय करते असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेल, पबमध्ये तरुण-तरुणी एन्जॉयमेंटसाठी येतात, ते ड्रग्ज व अंमली पदार्थांचे सेवन करत पार्टी करतात. पुण्यातील अशाच एका एल ३ हॉटेलमधील पार्टीत ड्रग्स घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये, चक्क हॉटेलमधील वॉश रुमममध्ये टॉयलेटजवळ बसून ते ड्रग्ज घेत असल्याचे दिसून येतात. या युवकांकडील हे ड्रग्ज, मॅफेनड्रग्स असल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. त्यामुळे, पुण्यातील ललीत पाटील प्रकरणात आलेले ड्रग्जप्रकरण अजून शांत नसल्याचं पुन्हा स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी, पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले असून या ५ जणांमध्ये हॉटेलचा मालक सुद्धा ताब्यात आहे. या व्यतिरिक्त याठिकाणी असलेला एक मॅनेजर आणि एक कर्मचारी सुद्धा ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान, या हॉटेलचे ३ पार्टनर देखील पोलिसांच्या ताब्यात असून संतोष कामठे, रवी माहेश्वरी, मानस मलिक, योगेंद्र आणि शर्मा असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
ड्रग्ज पार्टीचे विडीओ समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरण सिंह राजपूत, पूणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर व पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारीदेखील घटनास्थळी दाखल झाले. पुणे पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण करण्यात आले असून लिक्विड लीजर लाउंज एल ३ या हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत.सदर एल ३ हे हॉटेल पुणे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सील करण्यात येणार आहे. तयारीत आहेत.
बॉक्स
शंभूराज देसाई हे कसाई सारखे वागतात : आमदार रविंद्र धंगेकर
पुणे शहर आणि आसपासच्या भागात पहाटे तीन वाजेपर्यंत पब हे चालविले जात आहेत. या विरोधात पोलिस आयुक्त कार्यालयासमोर पब चालकांची यादी वाचून दाखविली होती. आता पुन्हा ती वेळ आणू नका, पोलिसांनी पब चालकांवर कारवाई करावी, अन्यथा पुन्हा पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. तसेच विभागाचे मंत्री शंभूराज देसाई हे केवळ कारवाई करु असे आश्वासन देतात. मात्र ते काही करत नसून ते कसाई सारखे वागतात, अशा शब्दांत काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला. तर येणार्या अधिवेशनात या विरोधात आवाज उठविणार असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.