नाशिक पुन्हा हादरले ! तरुणाची दगडाने ठेचून हत्या, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

नाशिक पुन्हा हादरले ! तरुणाची दगडाने ठेचून हत्या, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक – नाशिकमध्ये सध्या हत्येचं सत्र सुरू आहे. गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून कायद्याचा धाक आरोपींना राहिला नसल्याचे दिसून येत आहे. म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत अशोक तोडकर (वय २८, रा. आदर्शनगर, रामवाडी, नाशिक) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. हा युवक रिक्षाचालक असून तो सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता. सदर युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याचे बोलले जात असून शनिवारी दिवसभर हा युवक घरी होता.

परंतु, रात्री तो घराबाहेर पडला असावा, असे समजते. त्यानंतर रविवारी सकाळी आठ वाजता मयत युवकाच्या भावाला पोलिसांकडून त्याचा खून झाल्याची माहिती समजली. प्रशांतच्या पश्चात दोन भाऊ, एक बहिण आणि आई वडील असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मारेकऱ्याचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon