उसन्या पैशावरून मारहाण, तिघांना अटक; कोंढवा पोलिसांची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुण्यात कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गुन्हेगारी डोके काढत असते. एकाने हात उसने दिलेले पैसे परत मागितले असता तरुणाला धक्काबुक्की करुन दगडाने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.मुंढवा पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. याबाबत जखमी राजेंद्र तिरपतय्या केतनबोईना (वय-२८ रा. बी.टी. कवडे रोड, घोरपडी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन द्वारका बाबू बलबद्रा (वय-४२ रा. कृष्णाई नगर, बी.टी. कवडे रोड, मुंढवा), जेम्स बाबू बलबद्रा (वय-२४), जोयेल बाबू बलबद्रा (वय-२०) त्यांचा नातेवाईक मेशक (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर भा.द.वि. कलम ३०७, ३२६, ३२३, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन जेम्स बलबद्रा, जोयेल बलबद्रा आणि मेशक यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी राजेंद्र यांनी आरोपी द्वारका बलबद्रा हिला हात उसने पैसे दिले आहेत.राजेंद्र आरोपी महिलेकडे पैसे मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिने फिर्यादी यांना धक्काबुक्की केली. तर जेम्स आणि जोयेल यांनी फिर्यादी यांच्यासोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी द्वारका बलबद्रा यांच्या मुलांनी फिर्यादी यांना कै. बाळासाहेब रामभाऊ कवडे क्रिडांगण येथे बोलावून घेतले. त्यामुळे फिर्यादी त्याठिकाणी गेले असता आरोपींनी त्यांना लाकडी बांबूने मारहाण केली. तसेच डोक्यात दगड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल. पोलिसांनी सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्ह्याची कलम वाढ केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.