पुण्यानंतर आता कोल्हापुरात हिट अँड रन, भरधाव कारने तीन जणांना चिरडलं
योगेश पांडे / वार्ताहर
कोल्हापुर – कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात झाला. यावेळी भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरमध्ये असलेल्या सायबर चौकात दुपारच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात एका कारने अनेक गाड्यांना धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण जखमी झाले आहेत. शिवाजी विद्यापीठ रोडवरुन येत असताना कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यानंतर कार चालकाने चौकात उभ्या असलेल्या चार मोटार सायकलला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात ३ दुचाकी आणि एका कारचं मोठं नुकसान झाले आहे.
कोल्हापुरात झालेल्या या अपघातामुळे चौकात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. यानंतर राजारामपुरी पोलीस आणि शहर वाहतूक शाखेच्या वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.