बाबा लगीन ! वडील लग्न लावून देत नसल्याने दोन भावांनी बापालाच संपवलं, आधी बुटाने, मग चाकूने वार; दोघांना वाळूज पोलिसांनी घेतलं ताब्यात

Spread the love

बाबा लगीन ! वडील लग्न लावून देत नसल्याने दोन भावांनी बापालाच संपवलं, आधी बुटाने, मग चाकूने वार; दोघांना वाळूज पोलिसांनी घेतलं ताब्यात

योगेश पांडे / वार्ताहर 

छ. संभाजीनगर – वडील लग्न करुन देत नाहीत म्हणून दोन मुलांनी बापावर चाकूने वार केले. छत्रपती संभाजीनगर जवळच्या वडगाव कोल्हाटी इथे ही घटना घडली. या घटनेत ४८ वर्षीय संपत वाहूळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पोपट वाहूळ आणि प्रकाश वाहूळ या दोघांना वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपत वाहुळ या ४८ वर्षीय व्यक्ती वडगाव कोल्हाटी येथे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा पोपट वाहुळ, (२८) आणि प्रकाश वाहुळ, (२६) ही दोन्ही मुले एका कंपनीत काम करत होती. तर वाहुळ यांच्या नावावर शेती होती. ८ मे रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान लहान मुलगा प्रकाश कामावरून घरी आला. त्यावेळी वडील संपत वाहुळे हे घरात एकटेच होते. कामावर आलेल्य प्रकाश रागात होता. कामावरून आल्याबरोबर त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर कामवरील बुटाने वडिलांना मारहाण केली. त्यानंतर मोठा मुलगा पोपट देखील कामावरून आला. त्याने देखील वडिलांना आमचे वय वाढत आहे, तरी सुद्धा आमच्या लग्नाचे मनावर का घेत नाही, अशी विचारणा केली. त्यावर वडिलांनी तुम्ही दोघेही नीट वागत नाही, असे सांगितले.

वडिलांचे उत्तर ऐकून दोन्ही मुलांचा राग अनावर झाला. मोठा मुलगा प्रकाशने जवळील चाकू काढत वडिलांवर सपासप वार केले. दोन्ही मुले बापावर तुटून पडले बापाने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्याासाठी ते बाहेर पळाले तर मोठ्या मुलाने पकडले आणि लहान मुलाने त्यांच्यावर वार केले. आरडा ओरड ऐकून संपत वाहुळ यांचे भाऊ रामनाथ वाहुल, संजय वाहुळ, आकाश व संदीप वाहुळ हे मदतीस धाऊन आले, त्यावेळी हा आता वाचला तर गोळी घालून मारून टाकू अशी धमकी मुलांनी दिली. यामध्ये ते रक्तबंबाळ झाले. त्यानंतर संपत वाहुळ यांनाघाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रात्री ११.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन्ही मुलांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचार सुरू असतांना २३ मे रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तापास पोलीस करत आहे. या घटनेनंतर परिसरात मुलाच्या कृत्याबद्दल संताप तर वडिलांसाठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon