सासरा-सुनेच्या नात्याला कलंक ! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार
पोलीस महानगर न्यूज नेटवर्क
परभणी – सुनेला पिठाची गिरणी काढून देत उपकाराची परतफेड कर असे म्हणत सासऱ्याने सुनेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. सासऱ्यानेच सुनेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार परभणी जिल्ह्यातील जिंतूरमधून समोर आला आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे शहरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेच्या पतीला दारूचे व्यसन असून तो काहीच काम धंदा करत नाही. दिवसरात्र नशेत असतो. म्हणून सासऱ्याने पीडितेला पिठाची गिरणी टाकून दिली होती. त्या माध्यमातून पैसे कमवून ती घर चालवत होती. यावरुन सासऱ्याने तिला सुनावले होते. केलेल्या उपकारांची परतफेड कर म्हणत सासऱ्याने दुपारच्या वेळी घरात कुणी नसताना पीडितेकडे शरीरसुखाची मागणी करत तिच्यावर अत्याचार केला. तसंच,मी तुझा पूर्ण सांभाळ करेन तु माझ्या पत्नीसारखीच आहेस. याबबात कोणाला सांगू नकोस,असं म्हणत पीडित महिलेला धमकावले.
सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्यानंतर ती खूप घाबरली होती. मात्र वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून हिंमत करत तिने जिंतूर पोलीस स्थानक गाठून सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. पीडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या नराधम सासऱ्यांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात संपात व्यक्त करण्यात येत आहे.