नवी मुंबईतून ११ नायजेरियन व्यक्तींना अटक; तब्बल १६ कोटी रुपयांची कोकीन व एमडी ड्रग्ज जप्त

नवी मुंबईतून ११ नायजेरियन व्यक्तींना अटक; तब्बल १६ कोटी रुपयांची कोकीन व एमडी ड्रग्ज जप्त

योगेश पांडे / वार्ताहर 

नवी मुंबई – नवी मुंबई पोलिसांनी शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे . या कारवाईत ११ नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली असून नायजेरियन व्यक्तींकडून तब्बल १६ कोटी रुपयांचे कोकीन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. एनडीपीएस कायद्या अंतर्गत या ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील कोपरीगाव येथे हे नायजेरियन नागरिक राहत होते. येथे राहून ते ड्रग्सची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला.

यावेळी पोलिसांना तब्बल १६ कोटी रुपयांचे कोकेन आणि एमडी ड्रग्स मिळाले आहेत. अटक केलेल्या नायजेरियन नागरिकांकडे अमली पदार्थांचा साठा कुठून आला? हा साठा ते कुणाला विकत होते? त्यांची पूर्ण साखळी कशी आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon