कोल्हापूरमध्ये सेवा बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

Spread the love

कोल्हापूरमध्ये सेवा बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

पोलीस महानगर नेटवर्क

कोल्हापूर – कुरुंदवाड येथील पोलीस ठाण्यात पोलीस नाईक अरुण बालाजी नागरगोजे (वय-३८, सध्या रा. कुरुंदवाड मुळ रा. पाटोदा खुर्द, ता. जळकोट जि. लातूर) यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. त्यांच्या अचानक निधनामुळे पोलीस ठाण्यासह शहर पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

हेरवाड, अब्दुल लाट सारख्या संवेदनशील गावाची जबाबदारी त्यांच्यावर होती. गुरुवारी रात्रपाळी असल्याने रात्री हेरवाड, अब्दुल लाट, शिरदवाड परीसरात पेट्रोलिंग करत होते. पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस मुंबई येथील नियोजित बैठकीसाठी जाणार असल्याने नागरगोजे यांनी त्यांना पहाटे इचलकरंजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात सोडून आले होते. पोलिस ठाण्यात परतल्यानंतर छातीत दुखत असल्याने त्यांनी शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. मात्र दवाखान्याच्या आवारातच ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह प्रथम त्यांच्या राहत्या घरी, त्यानंतर पोलिस ठाणे येथे काहीकाळ थांबवून त्यांच्या मुळ गावाकडे पाठविण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले,  आई असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon